प्राणीसंग्रहालयाचा परिचय

हि दोन दिवसीय मासिक कार्यशाळा प्राणीसंग्रहालयात मोठ्या उत्साहात साजरी झाली. कुटुंबे, विद्यार्थी आणि निसर्गप्रेमींसाठी प्राण्यांच्या आकर्षक जगाचे अन्वेषण करण्यासाठीची ही एक विलक्षण संधी होती. या कार्यक्रमात मुख्यतः ज्येष्ठ नागरिक आणि तरुण उपस्थित होते जेथे विविध आकर्षक उपक्रम आयोजित केली होती. मुलांसाठी संवादात्मक चर्चा, शैक्षणिक चर्चासत्रे आणि मजेदार क्रियाकलाप होते. या कार्यक्रमाचा उद्देश लोकांना प्राण्याविषयी माहिती देणे तसेच त्यांना प्राण्यांशी जवळीकता साधण्याची संधी मिळवून देण्याचा होता. तसेच पर्यटकाना प्राणीसंग्रहालयाच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्याची आणि प्राण्यांच्या विविध प्रजातींबद्दल जाणून घेण्याची संधी देखील मिळाली. या कार्यशाळेने सहभागींना त्यांचे अनुभव सांगण्यासाठी तसेच त्यांचे विविध प्रश्न मांडण्यासाठी एक व्यासपीठ देखील प्रदान केले. सहभागी झालेल्या प्रत्येकासाठी हा एक आनंददायी आणि संस्मरणीय अनुभव होता.