सिंह प्रजातीच्या संरक्षण आणि संवर्धनाबाबत जनजागृतीसाठी दरवर्षी १० ऑगस्टला सिंह दिन प्राणीसंग्रहालयात साजरा केला जातो. जो नियमितपणे लोकांना प्रेरित तसेच शिक्षित करण्यासाठी, कुटुंबांना आणि वन्यजीव प्रेमींना एकत्र आणण्यासाठी आयोजित केला जातो. हा दिवस मजेशीर क्रियाकलापांनी आणि माहितीपूर्ण सत्रांनी भरलेला असून, या उपक्रमाचा उद्देश या प्राण्यांबद्दल प्रेम तसेच जागरूकता वाढवणे आहे. अनेक परस्परसंवादी क्रियाकालापानांसह पर्यटक प्राणी कल्याण आणि संवर्धनाचे महत्त्व जाणून घेतात. विद्यार्थी खेळ आणि प्रश्नमंजुषामध्ये गुंतून, निसर्गासोबत सहअस्तित्वाचे मौल्यवान धडे आत्मसात करतात. या कार्यक्रमाद्वारे, आम्ही वन्यजीव तसेच सिंहाचे संरक्षण करण्याचे महत्त्व याबद्दल जनजागृती करतो.