आमच्या संग्रहालयातील नवीन प्राण्यांशी ओळख करा

काही नवीन प्राणी प्रजाती लवकरच आमच्या प्राणीसंग्रहालय कुटुंबात सामील होतील!
या नवीन प्राण्यांचा शोध घेण्यासाठी सज्ज व्हा!

आम्ही भविष्यात काही नवीन प्राण्यांचा परिचय करून देण्याची कल्पना करत आहोत. या योजनेअंतर्गत नवीन प्राणी जसे कि ग्रँट्स झेब्रा, तरस आणि चौशिंगा इ. सारखे प्राणी लवकरच प्राणीसंग्रलायाच्या परिसरात पर्यटकाच्या प्रदर्शनासाठी आढळणार आहेत. 

  • झेब्रा

आयुष्य – २५  वर्षे 

वजन – २०० – ५४० किलो 

उंची – ११६  – १५०  सेमी

झेब्रा हा एक चतुष्पाद प्राणी आहे जो आफ्रिकेत आढळतो. घोड्या सारखा दिसणाऱ्या या प्राण्याच्या अंगावर काळे व पांढरे पट्टे असतात ही त्यांची सर्वात वेगळी वैशिष्ट्ये आहे. झेब्राच्या शरीरावर काळ्या किंवा तपकिरी पट्ट्यांमध्ये पांढरे पट्टे आढळतात आणि हे पट्टे त्यांच्या पोटाच्या आणि पायांच्या आतील बाजूस संपतात. आम्ही भविष्यात प्राणीसंग्रहालाच्या परिसरामध्ये या प्रजातीचा परिचय करून देण्याची योजना आखत आहोत.

 

  • तरस

आयुष्य – ८-१२  वर्षे 

वजन – ०.७-८.०  किलो 

उंची – ३०  सेमी

तरस हे हायनिड या वर्गात मोडत असून या मध्ये चार वेगवेगळ्या प्रजातींचा समावेश होतो. तरस हे मुख्यतः आफ्रिकन सवाना, गवताळ प्रदेशात आढळतो. हा प्राणी राखाडी-तपकिरी रंगाचा असून  त्यांच्या मानेवर आणि पाठीवर केस आढळतात. तरसाचे डोके मोठे असून मुस्कट टोकदार असते. पुढील पाय मागील पायांपेक्षा लांब व मजबूत असून मागील पाय आखूड व कमकुवत असतात. पाठीचा मागचा भाग अरुंद व उतरता असल्यामुळे त्याला कुबड आल्यासारखे वाटते. 

 

  • चौसिंगा

आयुष्य – २० वर्षे 

वजन – २-१० किलो 

उंची – ४० – ६१  सें.मी.

चौसिंगा हे भारत आणि नेपाळमध्ये आढळणार सर्वात लहान मृग आहे. इतर बहुसंख्य बोविड्सच्या विपरीत, ज्याला दोन शिंगे असतात, याला चार शिंगे असतात. चार शिंगे असलेला हा मृग लहान, आणि पिवळसर तपकिरी ते लालसर आवरण असलेला सडपातळ असतो. शिंगांचा एक संच कानांच्या दरम्यान असतो आणि दुसरा कपाळावर असतो. २-५  सेंमी लांब असलेला अग्रभागी शिंग हे मागच्या शिंगा (८ -१२  सेमी) पेक्षा लहान असतो.