https://punezoo.in/wp-content/uploads/2023/10/Wildlife-Education-mr-min.jpg

वन्यजीव शिक्षण

पर्यटक आणि विद्यार्थ्यांमध्ये वन्यजीव संरक्षणाबद्दल जागरूकता वाढवण्याच्या एकत्रित प्रयत्नात, प्राणीसंग्रहालय नियमित शैक्षणिक उपक्रम आयोजित करते. परस्परसंवादी प्रदर्शन आणि माहितीपूर्ण सत्रांद्वारे, आम्ही लोकांना नैसर्गिक जगाशी जोडण्याची एक अनोखी संधी प्रदान करतो.या कार्यक्रमात वन्यजीवांच्या विविध पैलूंचा समावेश होतो तसेच हे  प्रेक्षकांना संवेदनशील बनवते. याव्यतिरिक्त, जागतिक वसुंधरा दिन, जागतिक पर्यावरण दिन आणि जागतिक व्याघ्र दिन यासारख्या वार्षिक उपक्रमे देखील आयोजित केले जातात. तसेच प्राण्यांबद्दल जबाबदारीची भावना वाढवण्यासाठी सहभागी चर्चा, संबंधित क्रियाकलाप आणि तज्ञांच्या नेतृत्वाखाली विविध सादरीकरण केले जाते. वन्यजीव संरक्षणामध्ये वैज्ञानिक ज्ञान वाढविण्यासाठी, प्राणीसंग्रहालय परिसरात परस्परसंवादी प्रदर्शन आणि दृकश्राव्य सहाय्यांसह व्याख्या केंद्र विकसित केले जात आहे.

नियमित शैक्षणिक उपक्रम

कार्यशाळा

आमचे प्राणीसंग्रहालय शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करते, ज्याचा उद्देश वन्यजीवांबद्दल सहानभूती वाढवणे आहे. कार्यशाळेत वन्यजीव संरक्षण धोरणे, मानव-प्राणी संघर्ष आणि सुसंवादी सहअस्तित्व समजून घेणे यासारख्या महत्त्वाच्या विषयांचा अभ्यास केला जातो. हे संवर्धनाच्या प्रयत्नांमध्ये सार्वजनिक सहभागाच्या महत्त्वाच्या भूमिकेवर देखील भर देतात. तसेच, त्यांना सुनियोजित ज्ञानवर्धक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. ही कार्यशाळा पुढील पिढीसाठी आपल्या अमूल्य नैसर्गिक वारसाच्या संरक्षणासाठी सक्रियपणे योगदान देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ म्हणून उपलब्ध होत आहे.

शालेय भेट

राजीव गांधी प्राणीसंग्रहायल शैक्षणिक प्रवासाचा अनुभव घ्या! आम्ही आमच्या जाणकार मार्गदर्शकांच्या नेतृत्वाखाली शालेय भेटीची संधी मिळवून देतो. आणि एक संस्मरणीय व समृद्ध अनुभव सुनिश्चित करतो. तसेच, दरवर्षी, जागतिक पर्यावरण दिन आणि वसुंधरा दिनासारख्या प्रसंगी, आम्ही विद्यार्थ्यांना वार्षिक उपक्रमाच्या निमित्ताने प्राणीसंग्रहालयात भेट देण्यास प्रोत्साहित करतो. तसेच विद्यार्थ्यांना रांगोळी स्पर्धेसह विविध आकर्षक उपक्रमांमध्ये देखील सहभागी होण्याची संधी मिळवून देतो. त्यांचा सहभाग वाढवून शैक्षणिक आणि आनंददायक वातावरणात पर्यावरण संवर्धनाची त्यांची समज वाढवावि. तसेच शाळेच्या विशेष विनंतीने आम्ही त्यांच्यासाठी अश्या विविध उपक्रमाचे आयोजन करतो.

स्वयं-मार्गदर्शित शाळा भेटी

राजीव गांधी प्राणीसंग्रहालय, स्वयं-मार्गदर्शित शालेय भेटींची संधी उपलब्ध करून देतो. तसेच तुम्ही तुमच्या सोयी आणि वेळेनुसार प्राणीसंग्रहालयातील परस्परसंवादी प्रदर्शन आणि शैक्षणिक संसाधनांसह प्राण्यांचा अनुभव घेऊ शकता. आमचे प्राणीसंग्रहालय विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित आणि आकर्षक वातावरण प्रदान करते, तसेच विद्यार्थ्यांमध्ये प्राणी आणि निसर्गाबद्दल प्रेम वाढवते.