भारतीय वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ च्या कलम ३८ जे नुसार प्राणीसंग्रहालयात प्राण्यांना खायला घालणे, जखमी करणे, विनयभंग करणे, आवाजाने किंवा प्राण्यांना त्रास देणे आणि कचरा टाकणे हा दंडनीय गुन्हा आहे. दोषींना सहा महिने कारावासाची शिक्षा किंवा रु. २००० /- दंड भरावा लागू शकतो अथवा दोषी दोन्ही शिक्षा साठी बाध्य ठरू शकतो.
प्राणीसंग्रहालयाच्या परिसरात दारू, तंबाखू किंवा गुटखा यासारख्या अंमली पदार्थ, चघळण्यायोग्य पदार्थ आणि धूम्रपान करण्यास सक्त मनाई आहे. मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या कोणत्याही व्यक्तीला प्राणीसंग्रहालयात प्रवेश दिला जाणार नाही.
प्राणीसंग्रहालयात स्फोटक, दाहक, फटाके, बंदुक, कोणतीही शस्त्रे किंवा प्राण्यांच्या जीवाला धोका होईल असे कोणत्याही धोकादायक वस्तुंना परिसरात नेण्याची परवानगी नाही.
पर्यटकांना प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांना त्रास होईल असे कोणतेही संगीत किंवा वाद्य वाजवण्याची परवानगी नाही.
प्राणीसंग्रहालयात अन्न शिजविणे आणि कोणत्याही हेतूसाठी आग लावणे प्रतिबंधित आहे.
हवेने भरलेले फुगे आणि बॉल्स, शटल, बॅट, रॅकेट इत्यादी खेळाच्या वस्तुंना प्राणीसंग्रहालयात परवानगी नाही. .
प्राणीसंग्रहालयात पाळीव प्राण्यांना प्रवेश करण्याची परवानगी नाही.
कोणतीही व्यक्ती प्राणीसंग्रहालयाच्या मालमत्तेचे नुकसान करणार नाही, हा दंडनीय गुन्हा आहे.
नो-एंट्री क्षेत्रात प्रवेश करू नये.
पर्यटकांना प्राण्यांच्या आवरणाची सुरक्षा रेलिंग ओलांडण्याची परवानगी नाही.
प्राणीसंग्रहालयात प्लास्टिकच्या वापरावर बंदी आहे तसेच पर्यटकांनी त्यांचे सर्व खाण्याचे सामान कागदी पिशव्यांमध्ये नेणे आवश्यक आहे.
प्राणीसंग्रहालयात कोणत्याही प्लास्टिकच्या बाटलीसाठी किंवा प्लास्टिकच्या कोणत्याही वस्तूसाठी पर्यटकांना अनामत रक्कम म्हणून १०/- रुपये द्यावे लागतील. काउंटरवर तीच प्लास्टिकची वस्तू आणि पावती दाखवल्यावर पर्यटकांना ठेवीची रक्कम परत केली जाईल.
पर्यटक मुख्य रस्त्यालगतच्या बाकांवर किंवा विश्रांतीच्या शेडच्या आत बसू शकतात.
पर्यटकांना संग्रहालयातील फुले, पाने किंवा फळे तोडण्याची परवानगी नाही.
पर्यटकांनी त्यांच्या सोबतच्या व्यक्तीची तसेच मुलांची काळजी घ्यावी.
पर्यटकांनी माहितीच्या चिन्हावर लिहिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे आणि सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.
बॅटरीवर चालणारी कार उपलब्धीची गॅरंटी दिली जाऊ शकणार नाही, सेवा वाहनाच्या उपलब्धतेच्या अधीन असेल.
अपंग पर्यटकांसाठी व्हीलचेअर उपलब्ध आहेत, वापरकर्त्यांना रु.१००/- ठेव म्हणून दयावी लागेल जे बाहेर पडताना व्हील चेअर आणि पावती दाखवल्यावर परत केले जाईल.
ज्या पर्यटकांनी तिकीट विकत घेऊन प्राणीसंग्रहालयात प्रवेश केला असेल असे पर्यटक प्राणीसंग्रहालयातून बाहेर पडल्यानंतर प्रवेश तिकिटाची वैधता संपेल. पुन्हा प्रवेश करण्यासाठी पर्यटकांना नवीन तिकीट खरेदी करावे लागेल.
पर्यटकांनी प्रवेशद्वारावर काम करणाऱ्या प्राणीसंग्रहालयाच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे आणि त्यांच्या अधिकृत कर्तव्यात अडचण निर्माण करू नये.
प्राणीसंग्रहालयाच्या आवारात खाजगी वाहनांना परवानगी नाही.
अधिकृत बुकिंग वेळेनंतर कोणत्याही पर्यटकांना प्राणीसंग्रहालयात प्रवेश दिला जाणार नाही.